आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सांगोला महाविद्यालयाला तिहेरी पदक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने के.एन. भिसे महाविद्यालय कुर्डवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सांगोला महाविद्यालयातील खेळाडू गणेश कैलास गाडे (एम.ए.-2 हिंदी)याने (फ्री स्टाईल) 65 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. विक्रम सिंह भारत भोसले (एम.ए.-1 हिंदी)याने (ग्रीको रोमन) 97 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठ संघामध्ये निवड झाली. परमेश्वर भैरवनाथ गाडे (एम.ए.-2 हिंदी) याने (फ्री स्टाईल) 86 किलो वजन गटांमध्ये व्दितीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष श्री.तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झपके, खजिनदार श्री.नागेश गुळमिरे, सचिव श्री.ॲड.उदयबापू घोंगडे, सहसचिव श्री. साहेबराव ढेकळे व संस्था सदस्य् तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. जगदीश चेडे व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.