महाराष्ट्र

जवळे प्रशालेत मा.आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थांतर्गत कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न.

जवळे( वार्ताहर)सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेते माजी आमदार विद्या विकास मंडळ जवळ्याचे अध्यक्ष सन्माननीय दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भगवतभक्त स्वर्गीय शारदादेवी(काकी)साळुंखे-पाटील व कार्यतपस्वी माजी आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने 31 डिसेंबर ते 14 जानेवारी हा पंधरावा विद्या विकास मंडळ जवळे संस्थांतर्गत विविध बौद्धिक स्पर्धा व क्रीडा स्पर्धांनी तसेच सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो.

 

त्यानिमित्ताने कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णा साहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे मध्ये संस्थांतर्गत रविवार दिनांक 5 जानेवारी 2025रोजी कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सांगोला तालुक्याचे युवा नेते एडवोकेट यशराजे साळुंखे- पाटील तसेच जवळा गावच्या विद्यमान सरपंच सौ.सुषमाताई घुले- सरकार संस्था सचिव सुभाष लऊळकर सर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य  सभापती साहेबराव पाटील,माजी सरपंच श्री.दत्तात्रय बर्वे,संस्था उपाध्यक्ष मा.मानाजीराव घुले-सरकार,माजी मुख्याध्यापक श्री. विलासराव घुले सर,जवळा प्रशालेचे प्राचार्य श्री.बाळासाहेब  शिंदे सर, स्पर्धा समिती अध्यक्ष वाडेगाव प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.मनोज  उकळे सर, हातीत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील घोडके सर श्री.वैभव देशमुख,श्री.पंडितकाका साळुंखे,चेअरमन श्री.अनिल साळुंखे,श्री.अनिल सुतार,पोलीस पाटील श्री.अतुल गयाळी तसेच संस्थेच्या विविध प्रशालेतील क्रीडाशिक्षक,शिक्षक खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व भगवतभक्त स्वर्गीय शारदादेवी (काकी)साळुंखे-पाटील यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

 

त्यानंतर मा.यशराजे साळुंखे-पाटील यांचा प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वच उपस्थित मान्यवरांचा व पंच यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समिती प्रमुख श्री.मनोज उकळे सर यांनी केले. त्यांनी या पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचे उपक्रमांचे स्वरूपाची माहिती दिली. त्यानंतर संस्था सचिव श्री.सुभाष लऊळकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर युवा नेते यश राजे साळुंके पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कबड्डी मैदानाचे पूजन करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. व स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

संस्थेतील सर्व प्रशालेतील एकता पाचवी ते बारावी मुले व मुली यांच्या विविध गटांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.पंच म्हणून क्रीडा  शिक्षक डि.के. पाटील सर, पंच प्रमोद काळे, दीपक चंदनशिवे पंकज गव्हाणे, महेश भोसले, राजेंद्र लोखंडे आणि काम पाहिले. तर गुणलेखन व टाईम कीपर म्हणून निघाले सर्व गाडेकर सर यांनी काम केले. अतिशय उत्साही वातावरणात कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. यशस्वी संघाचे अभिनंदन करण्यात आले या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व प्रशालेतील क्रीडा शिक्षक,शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.लांडगे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button