महाराष्ट्र

सांगोला महाविद्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात मंगळवार दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त्त त्यांच्या प्रतिमेस महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी त्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. तसेच त्यांनी आपल्या मनोगतात भारत देशास अण्वस्त्राच्या बाबतीत परिपूर्ण करण्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधीचे मोलाचे कार्य असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बांगलादेशाच्या  निर्मितीमध्ये त्यांनी कणखर नेतृत्व करीत प्रभावी कामगिरी केली म्हणून त्यांना भारताच्या “आयर्न लेडी” म्हणून जगभर ओळखले जाते असे मत व्यक्त् केले. तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकालात कृषी, विज्ञान, सरंक्षण व अंतर्गत सुरक्षा याबाबतीत केलेल्या उल्लेखनिय कार्याचीही त्यांनी माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमासाठी अधिक्षक श्री.प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. जमीर तांबोळी, श्री. बाबासो इंगोले यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button