सांगोला विधानसभा निवडणूक :मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार
सांगोला प्रतिनिधी:253 सांगोला विधानसभा साठी मतमोजणी दिनांक 23/11/ 2024 रोजी सकाळी 8:00 वाजता सुरू होणार आहे सदरची मतमोजणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असून या मध्ये अधिकारी व कर्मचारी मिळुन सुमारे 100 जणांची टीम कार्यरत केली असुन
निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी मतमोजणीसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱी यांना आदेश दिलेले आहेत
मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली असून एकूण 23 फेऱ्या होणार असून त्यासाठी 14 टेबल ठेवण्यात आले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितलेले आहे
मतमोजणी सुलभ होण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत संपूर्ण मतमोजणी साठी नियंत्रण अधिकारी, स्लिप मोजण्यासाठी अधिकारी, स्ट्रॉंग रूमसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे आणि 9 कर्मचारी नेमण्यात आलेले असून सिलिंग टीम , नेमलेले आहेत ,भोजन व्यवस्था, हजेरी घेणे, स्क्रीन डिस्प्ले, व्हिडिओ चित्रीकरण, रिपोर्टिंग साठी ,आणि मीडिया साठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे,