नाझरा विद्यामंदिर मध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

नाझरा(वार्ताहर):- राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त 17 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनियुक्त सरपंच अर्चना सरगर उपसरपंच सुमित्रा लोहार, प्राचार्य बिभीषण माने पर्यवेक्षक मधुकर धायगुडे ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील व विजय सरगर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे पुढील चार वर्षे प्रत्येकी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहेत,तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थी पात्र झाले असून त्यांना दरवर्षी 9600 प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहेत.
एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी बाबर आदर्श , पाटील अस्मिता, बाबर सुशांत, खळगे गौरी,आडसूळ मानसी, राऊत विराज, आदट राजवीर, देशपांडे सोहम,वलेकर रोहित,गोडसे ओम, वाघमारे वेदांत तर छत्रपती राजश्री शाहू महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी बाबर वैष्णवी , बाबर श्रेयसी ,बाबर सिया , मिसाळ अमोल , वराडे प्रथमेश , यादव सुरज यांना पालकांसमवेत सन्मानित करण्यात आले.
सर्वप्रथम कै. गुरुवर्य बापुसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बाह्य परीक्षा विभाग प्रमुख वसंत गोडसे, एन.एम. एम.एस. परीक्षा विभाग प्रमुख मारुती सरगर,सोमनाथ सपाटे, संजय चौधरी, महालिंग पाटील या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुनील जवंजाळ यांनी मांनले.



