सांगोला तालुका

यंदा विवाहाचे 58 मुहूर्त; जाणून घ्या कोणत्या महिन्यात सर्वाधिक मुहूर्त

 दिवाळीचा उत्सव आणि तुळशीविवाह संपताच लग्नसराईची धामधूम सुरू होते. पंचांग शास्त्राप्रमाणे यंदा 25 नोव्हेंबर ते पुढील वर्षी 28 जूनपर्यंत एकूण 58 विवाह मुहूर्त राहणार आहेत. सर्वाधिक 14 मुहूर्त मे महिन्यात असून, गुरूच्या अस्तामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच मुहूर्त राहणार आहे. त्यामुळे यंदा कडाक्याच्या उन्हातच सनई चौघडे वाजणार आहेत.

साधारणपणे मे नंतर सर्वाधिक विवाह एप्रिलमध्ये होत असतात. मात्र यावेळी गुरूचा अस्त असल्यामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच दिवस (30 एप्रिल) मुहूर्त आहे. तर जूनमध्ये 12 आणि फेब्रुवारी महिन्यात 10 मुहूर्त राहणार आहेत. 2023 मध्ये 29 जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे. शास्त्रानुसार या सुमारास विवाह आणि मौंजीचे मुहूर्त नसतात. त्यामुळे चातुर्मास्य समाप्तीनंतर (24 नोव्हेंबर 2023 नंतर) विवाह मुहूर्त राहणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. पुढील वर्षी 22 एप्रिलपर्यंत गुरू मीन राशीत अर्थात स्वराशीत असल्यामुळे या काळात सर्वच राशींना गुरू शुभ फलदायक आहे. 23 एप्रिल 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत गुरू मेष राशीत राहणार आहे. त्यामुळे या काळात मिथुन, सिंह, तूळ, धनू व मीन या राशीच्या बटूंना आणि वधूवरांना उत्तम गुरूबळ लाभणार असल्याचे ते म्हणाले.

विविध महिन्यांतील विवाह मुहूर्त

नोव्हेंबर (2022) :25, 26, 28, 29
डिसेंबर : 2, 4, 8, 9, 14, 16, 17, 18, 19
जानेवारी (2023) : 18, 26, 27, 31
फेब्रुवारी :6, 7, 10, 11, 14, 16, 23, 24, 27, 28
मार्च : 9, 13, 17, 18
एप्रिल : 30
मे : 2, 3, 4, 7, 9, 10, 11, 12, 15, 16,21, 22, 29, 30
जून : 1, 4,7, 8, 11, 12, 13, 14, 23, 26, 27, 28
महिन्यांसमोर दिलेल्या या तारखांवर पंचांगांनुसार विवाहाचे शुभ मुहूर्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!