महाराष्ट्र
कोळा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उद्घाटन सोहळा संपन्न.

कोळ्या सारख्या ग्रामीण भागामध्ये शासनाच्या वतीने नव्याने १०२ रुग्णवाहिका मिळाल्याने गोरगरीब नागरिकांना याचा निश्चित फायदा होणार आहे गावचे क्षेत्रफळ मोठे असल्याने गावे वाड्यावस्त्या चारी बाजूंनी विखुरलेली आहेत. त्यामुळे त्या गावातील गरोदर माता व रुग्णांना वेळेत रुग्णसेवा मिळावी, वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब लागू नये या दृष्टीने नव्याने सर्व सोयी सुविधा मिळणार असल्याचे विचार कोळा गावचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथे कोळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जुनी १०२ ॲम्बुलन्स खराब झाली असल्यामुळे नवीन ॲम्बुलन्स दाखल झाली त्यांचे उद्घाटन ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी,युवक नेते अशोक आबा आलदर यांच्या हस्ते हार घालून नारळ फोडून उद्घाटन सोहळा तसेच माजी सरपंच सिताराम सरगर उपसरपंच सादिक पटेल रफिक भाई तांबोळी पत्रकार जगदीश कुलकर्णी मदन आलदर ॲड निलेश मदने,अमोल मोहिते समाधान बोबडे विठ्ठल माने शिंदे एच ए शिंदे चालक बाबर मलिकार्जुन कोंपे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना तुकाराम आलदर पुढारी म्हणाले गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता 102 हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध त्वरीत होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. वाहतुकीची सुविधा व आर्थिक अडचणीमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रसूतीपूर्वी व नंतर गर्भवतींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली जाणार आहे. ही रुग्णवाहिका अत्याधुनिक राहणार असून, त्यामध्ये ऑक्सिजनचे सिलिंडर तसेच ती वातानुकूलित राहणार आहे. या सेवेचा लाभ घेण्याकरिता १०२ हा क्रमांक डायल केल्यानंतर फोन केंद्रीय संपर्क कक्षात जोडला जाईल. ज्या परिक्षेत्रातील रहिवासी असाल त्या परिक्षेत्रातील राष्ट्रीय रुग्णवाहिका गर्भवतींच्या व बालकांच्या सेवेकरिता उपलब्ध होणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या ठिकाणी या उपक्रमाचे जिल्हा संपर्क कक्ष स्थापन होईल.या कक्षांच्या माध्यमातून रुग्णांचा फायदा होणार आहे असे तुकाराम दादा आलदर यांनी शेवटी सांगितले…
कोळा कराडवाडी कोंबडवाडी डोंगर पाचेगाव किडबिसरी, तिप्पेहळी जुनोनी, गौडवाडी, काळूबाळूवाडी, जुजारपूर, हटकर मंगेवाडी हातीद बुधेहाळ या भागातील रुग्णांना फायदा होणार आहे.