रेल्वे बोगद्यातील लागलेले ग्रहन केव्हा संपणार. रेल्वे प्रशासन बेफिकीर

मिरज रोड येथील रेल्वे भुयारी मार्गाचे लागलेले ग्रहन केव्हा संपणार असा प्रश्न येथील नागरिक सातत्याने करत आहे.
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने या समस्यांचे निवेदन, स्मरणपत्र रेल्वे विभागीय व्यवस्थापक ,सोलापूर, सहाय्यक मंडल इंजिनिअर पंढरपूर यांना देण्यात आले.
या बोगद्यामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीने अपघाताची मालिका सुरूचआहे,ही बाब रेल्वे प्रशासनास वारंवार आंदोलने करून निदर्शनास आणून दिली तरीही गेल्या एक वर्षापासून प्रशासन केवळ चाल ढकल करत आहे. या मार्गात स्ट्रीट लाईटची सोय नसल्याने सायंकाळी अपघाताची संख्या वाढली आहे.अनेक अपघातामुळे नागरिकांनाअवयव निकामी झाल्याने या मार्गावरून प्रवास करने जिकरीचे बनले आहे.रेल्वे अंतर्गत येणाऱ्या परतेक विभाग या कामाची जबाबदारी झटकत आहे. अजुन रेल्वे प्रशासन किती सर्वसामान्य नागरीकांचा अंत पाहणार आहे. या ठिकाणी अशोक कामटे संघटना वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे.
याठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे रेल्वे प्रशासना जबाबदार राहील.येत्या 4 दिवसात येथील समस्येवर उपाय योजना न केल्यास शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची संपुर्ण जबाबारी रेल्वे प्रशासनाची राहील.