महाराष्ट्र

कै. रामभाऊ वाघमोडे(काका) यांच्या पुण्यसमरण दिन शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये साजरा

शिवणे शिक्षण प्रसारक मंडळ,शिवणे चे संस्थापक उपाध्यक्ष तसेच सोलापूर डी सी सी बँकेचे माजी संचालक व कै. आ. भाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेब यांचे निकटवर्तीय कै. रामभाऊ वाघमोडे(काका)यांच्या 11व्या पुण्यसमरण दिनानिमित्त शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष बबनराव जानकर होते तर प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. निकीताताई देशमुख होत्या.तर संस्था उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे,संस्था सदस्य मोहन गेळे, धनंजय घाडगे ,माजी प्राचार्य सुबराव बंडगर,माजी सरपंच धोंडीराम जानकर प्राचार्य विजयकुमार वाघमोडे,डॉ.संजय वाघमोडे हे प्रमुख उपस्थित होते.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कै. रामभाऊ काका वाघमोडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्था अध्यक्ष बबनराव जानकर, संस्था उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे,माजी प्राचार्य सुबराव बंडगर प्रा.राजाभाऊ कोळवले यांनी आपल्या मनोगतातून कै. रामभाऊ काका वाघमोडे यांच्या कार्याला उजाळा दिला.
प्रमुख व्याख्याते पंजाबराव डख यांनी पाऊस पडण्याच्या तारखा सांगताना तो कधी आणि किती पडणार हे शेतकऱ्यांनी कसे ओळखावे याची सविस्तर माहिती देताना प्राण्यांच्या हालचाली,पक्ष्याच्या हालचाली,पिके,वनस्पती घराचे लाकडी दरवाजे आकाशाचा रंग याचा अभ्यास केला तर आपणास पाऊस कधी पडणार हे समजते हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले .तसेच गारपीट वादळ,वीज पडणे यावेळी शेतकऱ्यांनी काय करावे याची माहिती दिली.

आपल्या मार्गदर्शन पर भाषणात डॉ.सौ.निकीताताई देशमुख यांनी आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायाम आणि आहार किती महत्वाचा आहे याबद्दल माहिती देऊन मुलींनी शिक्षण अर्धवट सोडता कामा नये हे सांगितले.

या कार्यक्रमानंतर न्याब नेत्रालय मिरज येथील डॉ.विपुल माळी आणि डॉ.मंदार प्रभुदेसाई यांच्या नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन डॉ.सौ.निकीताताई देशमुख व पंजाबराव डख व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दिवसभर चाललेल्या या शिबिरात 150 रुग्ण तपासण्यात आले व त्यातील 50 लोकांना मिरज येथे मोफत ऑपरेशन करण्यासाठी बोलाविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी व शिबिरासाठी आलेल्या सर्व नागरिकांना व सर्व विद्यार्थ्यांना वाघमोडे कुटुंबीयांतर्फे जेवण देण्यात आले.
सदर कार्यक्रमास रामकृष्ण जानकर,,बाळासाहेब घडगे,आनंदा वाघमोडे,महारनवर गुरुजी,सौ.उज्वला वाघमोडे,सौ.जानकर अलका,सौ.पूजा शेळके,सौ.कामिनी काळे यांच्या सह बहुसंख्य महिला व पुरुष ,शेतकरी आणि युवक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button