भारत आणि बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार का व्हिलन
जाणून घ्या मॅच होणार की नाही

अॅडलेड : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना हा अॅडलेड येथे होणार आहे आणि मंगळवारी येथे जोरदर पाऊस पडला आहे. त्यामुळे आता बुधवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना सुरु असताना पाऊस पडणार की नाही, याचा अहवाल आता समोर आला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सर्वच ठिकाणी पाऊस सुरु आहे. खासकरून अॅडलेड आणि मेलबर्न या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. आज अॅडलेडमध्ये चांगलाच पाऊस पडला आहे आणि तिथलं वातावरणही थंड झालं आहे. त्यामुळे आता भारत आणि बांगलादेशचा संघ जेव्हा सामना खेळणार आहे, त्या बुधवारी कधी नेमका पाऊस पडू शकतो, याबाबत हवामान खात्याने संकेत दिले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना बुधवारी होणार आहे आणि या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अॅडलेडमध्ये संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना सुरु असताना दुसऱ्या डावात पाऊस पडू शकतो किंवा सामना संपल्यावर काही वेळाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करावा लागणार नसला तरी कदाचित काही षटके कमी केली जाऊ शकतात. कदाचित डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामन्याचा निकालही लागू शकतो. त्यामुळे हा सामना भारताचे भवितव्य ठरवणारा असेल. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होतं, भारतीय संघ विजय मिळवणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताने जर हा सामना गनावला तर त्यांचा हा सलग दुसरा पराभव ठरेल आणि उपांत्य फेरीत पोहोचण्याचे त्यांचे आव्हान खडतर होऊ शकते. त्यामुळे या सामन्यात पावसाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल