महाराष्ट्र
जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे महामानवाला अभिवादन

जिल्हा परिषद शाळा मेडशिंगी येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मेडशिंगी गावातील जेष्ठ नागरिक श्री कैलास कसबे यांनी केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद कसबे यांनी दिली
सदरच्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री अतुल कसबे माजी सदस्य श्री कबिर मोरे श्री अमित कसबे श्री प्रथमेश कसबे आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी केले
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार केंद्रिय मुख्याध्यापक श्री राजेश गडहिरे सर यांनी मानले



