महाराष्ट्र
सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांची संगणक वसुली रक्कम परत मिळणार..- अध्यक्ष वसंतराव दिघे

सांगोला तालुक्यातील 48 शिक्षक व सोलापूर जिल्ह्यातील 214 सेवानिवृत्त शिक्षक विहित मुदतीत एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत म्हणून त्यांच्या सेवानिवृत्त उप दानातून दिलेल्या वार्षिक वेतन वाढ कपात करून घेतली होती व या विरोधात सांगोला तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक दिनकर घोडके व इतर 47 जणांनी उच्च न्यायालय मुंबई येथे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिक्षकांच्या बाजूने लागला व त्यामुळे तालुक्यातील 48 शिक्षकांना ही रक्कम मिळणार व जिल्ह्यातील 214 जणांना याचा लाभ होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांनी सांगितले.
सदर प्रसंगी शिक्षक नेते शिवानंद भरले, सुभाष फुलारी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सांगोला तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे, सल्लागार शंकर सावंत, एकनाथ जावीर, दत्तात्रय खामकर व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व त्यामुळे शिक्षकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे संचालक विलास नलवडे यांनी सांगितले.



