व्यंकटेश्वरा अग्रो अंड पावर प्रोसेसिंग युनिट कोल्हापूर बेळगाव यांच्यावतीने जवान आणि शेतकरी यांचा मेळावा चे आयोजन

सांगोला (वार्ताहर) व्यंकटेश्वरा अग्रो अंड पॉवर प्रोसेसिंग युनिट बेळगाव आणि कोल्हापूर यांच्यावतीने सांगोला येथे हॉटेल फाईव्ह स्टार गुळमिरे कॉम्प्लेक्स एसटी स्टँड जवळ येथे माजी सैनिक आणि शेतकरी यांच्या मेळाव्याचे आयोजन दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये शेतकरी आणि जवान यांना आधुनिक शेती आणि शेती पूरक व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन कोल्हापूर आणि बेळगाव युनिटचे श्री विनोद गंभीरे आणि यल्लाप्पा झांगुरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत. तसेच व्यंकटेश्वर ऍग्रो पावर अँड प्रोसेसिव्ह मिनिट चे कार्य गट शेती तसेच सामुदायिक शेती करणे सेंद्रिय खताचा वापर करून शेती करणे. तसेच आलेल्या मालाला योग्य भाव मिळून एक्सपोर्ट करणे विषयी संस्थेचे चाललेल्या कार्याची प्रणाली सभासदांना समजावून सांगणे आणि नवीन सभासद जोडणे तसेच आपली पारंपारिक शेती पासून आधुनिक शेतीकडे कसे जास्त उत्पादन काढून बाजारपेठेत रास्त भाव मिळवून देणे इत्यादी बाबीवर चर्चा मार्गदर्शन होणार आहे
तरी सर्व आजी-माजी सैनिक शेतकरी मित्र यांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवून आपले शेतीविषयक आणि शेतीविषयक पूरक व्यवसाय यासंबंधी इतम्बु माहिती करून घ्यावी असे व्यंकटेश्वरा अग्रो आणि पावर प्रोसेसिंग चे सांगोला सदस्य मेजर नरेश बाबर आणि मेजर उत्तम चौगुले यांनी आव्हान केले आहे.