महाराष्ट्र
रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने अंध दांपत्यास सहाय्य.

रोटरी क्लब ऑफ सांगोला यांचे तर्फे आज सांगोला येथील अंध दांपत्यास मोफत कॅलेंडर देऊन मदत करण्यात आली. सांगोला येथील श्री राजू बंडगर व त्यांच्या पत्नी या अंध जोडप्यास आज उदर निर्वाह करता मदत करण्यात आली. हे दाम्पत्य S.T.स्टॅंडवर लोकांच्या गरजेच्या विविध छोट्या वस्तू विकून उदरनिर्वाह करते.रोटरी क्लब ने त्यांची मागणी लक्षात घेता वर्ष २०२५ चे नूतन महालक्ष्मी कॅलेंडर चे १०० नग मोफत पुरवीण्यात आले.त्यांना कॅलेंडर पुरवून रोटरीने त्यांना उदरनिर्वाहासाठी मदत केली आहे. याप्रसंगी ज्यांना मदत दिली ते श्री. राजू बंडगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रोटरी क्लबचे खूप आभार मानले.
तसेच रोटरी कडून आम्हाला नेहमीच उदरनिर्वाहासाठी मदत मिळते असे सांगितले.यावेळी अध्यक्ष रो. विकास देशपांडे यांनी रोटरी ही कायम शुद्ध हेतूने काम करत असते असे सांगितले.यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप मोठा होता.या कार्यक्रमास रोटरी क्लबचे सचिव रो.इंजि.विलास विले,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.ज्ञानेश्वर कमले,रो. अरविंद डोंबे गुरुजी,रो.महादेव बोराळकर सर व ग्रामस्थ हजर होते.