महाराष्ट्र
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये काव्यवाचन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

सांगोला शहरातील नामंकित न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमन महिला अर्बन को ॲाप क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश शिनगारे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी व्यासपीठावर न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,संस्था सदस्य प्रा.दिपकराव खटकाळे,पर्यवेक्षक दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर,सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात अमोल पाकले सर यांनी प्रशालेतील काव्यवाचन स्पर्धेचा आढावा घेतला.
पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक गौरी संतोष कोडग द्वितीय क्रमांक गिता गणेश शिनगारे तृतीय क्रमांक मानसी राजेश माने उत्तेजनार्थ श्रावणी विष्णू माळी व श्रावणी संजय बजबळकर यांनी प्राप्त केला.तर आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक वैभवी रामचंद्र हाके द्वितीय क्रमांक समृद्धी विष्णू माळी तृतीय क्रमांक वैष्णवी दिपक माने तसेच उल्लेखनीय कामगिरी साठी इयत्ता पाचवी मधील विश्वतेज प्रकाश सातपुते,उत्कर्ष किशोर बिडे,कृष्णाली बाळासो सातपुते या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले अनिल पवार सर,कविता शिंदे मॅडम व अनिल खरात सर यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे गणेश शिनगारे साहेब म्हणाले की,शिक्षणाबरोबरच आपल्यात दडलेले विविध कलागुण सर्वांसमोर येणे आवश्यक आहेत.तुम्ही सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे.यापुढील काळात जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कामगिरीची चमक विद्यार्थ्यांनी दाखवावी.सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाकले सर यांनी केले तर आभार वैशाली घोडके मॅडम यांनी मानले.