महाराष्ट्र
कोळा येथे स्व भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथी जयंतीनिमित्त रक्तदान व डोळ्याचे शिबिर संपन्न…
सांगोला तालुक्यातील कोळा येथे लक्ष्मी देवी मंदिरात स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांच्या पुण्यतिथी व जयंती औचित्य साधून सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल सांगली यांच्या वतीने तसेच अश्विनी ब्लड बँक सोलापूर यांच्यामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोतीबिंदू डोळ्याचे शिबिरामध्ये २४० रुग्णांनी सहभाग घेतला तसेच रक्तदान शिबिरामध्ये १५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवून शिबीर यशस्वी केले अशी माहिती कोळा गावचे शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी यांनी दिली.
कोळा गावातील लक्ष्मी मंदिरात डोळ्याचे व पांडुरंग कॉम्प्लेक्स मध्ये रक्तदान शिबिराचे स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली या शिबिराचे उद्घाटन तुकाराम दादा आलदर पुढारी यांच्या व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी सर्व नेते मंडळी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास कोळा गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी,माजी सरपंच सिताराम सरगर, ,प्रा मारुती सरगर सर,सूतगिरणीचे संचालक प्राध्यापक कुडलिक आलदर सर, उपसरपंच डॉ सादिक पटेल, मा प्राचार्य यशवंत शितोळे सर रफिक भाई तांबोळी, खरेदी विक्री संघाचे संचालक मारुती हातेकर, पत्रकार जगदीश कुलकर्णी, लोकनेते रमेश कोळेकर, नामदेव आप्पा आलदर, सोपान कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे, पैलवान हरिभाऊ सरगर,अशोक आलदर शामराव सरगर,अशोक आलदर, वंदनाताई सरगर, मेहबूब आतार, बिरा कोळेकर, अमोल मोहिते, मेजर सुभाष घोडके, शिवाजी हातेकर, दगडू सरगर,अमोल मोहिते, ॲड निलेश मदने,दगडू कोळेकर दगडू सरगर बजरंग आलदर, नौशाद भाई तांबोळी भागवत पोरे,संदिपान आलदर,बाळासाहेब कोळेकर, राहुल वाले,जलाल पटेल, अनिकेत पोरे, यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष सहकार्य सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल गणेश नगर सांगली यांचे डॉक्टर सुरेश वाघ अशोक ठोकळे ओंकार आवळे हर्षद माने आर्यन परदेशी यांचे लाभले. प्रास्ताविक प्राध्यापक मारुती सरगर आभार पत्रकार जगदीश कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी कामगार पक्ष पुरोगामीयोग संघटना डॉक्टर बाबासाहेब देशमुख प्रेमी यांच्यासह सर्व नेते मंडळी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.



