सूर्योदय अर्बनच्या चेअरमनपदी डॉ बंडोपंत लवटे तर महिला अर्बनच्या चेअरमन पदी सौ अर्चना इंगवले

सांगोला तालुका आणि जिल्ह्याच्या परिसरामधील शेतकरी, पशुपालक त्याचबरोबर छोटे-मोठे उद्योजक आणि व्यावसायिकांचा आर्थिक कणा म्हणून नावारूपास आलेल्या सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या चेअरमनपदी डॉ बंडोपंत लवटे यांची आणि व्हाईस चेअरमन पदी सुभाष दिघे गुरुजी यांची बिनविरोध निवड संपन्न झाली. तसेच सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या चेअरमनपदी सौ अर्चना अनिल इंगवले यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ ज्योती जगन्नाथ भगत यांची बिनविरोध निवड संपन्न झाली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून निबंध कार्यालयाकडील मा अमर गोसावी साहेब यांनी काम पाहिले.
आर्थिक संस्था चालवण्याचा आणि सहकाराचा प्रदीर्घ अनुभव असलेले सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक उद्योगरत्न अनिलभाऊ इंगवले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या दोन्ही संस्थांची वाटचाल सुरू असून योग्य व गरजू कर्जदारास अत्यंत सुरक्षितपणे कर्ज वितरण आणि शंभर टक्के वसुली तसेच ठेवीवरती आकर्षक व्याजदर आणि ठेवींचे संरक्षण त्याचबरोबर लॉकर्स सुविधा, आरटीजीएस, एनएएफटी यासारख्या ऑनलाईन बँकिंग सुविधा ही या संस्थांची वैशिष्ट्ये आहेत. सूर्योदय अर्बन महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण सोलापूर जिल्हा असून सांगोला शहरातील महात्मा फुले चौकातील खरेदी विक्री संघाच्या प्रशस्त इमारतीमध्ये गेल्या काही वर्षापासून सक्षमपणे सेवा देत असलेल्या मुख्य शाखेसह सांगोला तालुक्यातील मेडशिंगी,सोनंद आणि शिरभावी तसेच मंगळवेढा शहर, रांजणी ता. पंढरपूर आणि टाकळी सिकंदर ता मोहोळ अशा सात शाखांमधून विविध स्तरांतील ग्राहकांना विनम्रपणे सेवा देत आहे. या संस्थेने नुकताच ठेवींचा शंभर कोटींचा टप्पा ओलांडला असून 200 कोटींकडे दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे. संस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले तसेच सहसंस्थापक जगन्नाथ भगत यांनी यावेळी बोलताना संस्थेची आजवरची वाटचाल आणि भविष्यातील ध्येयधोरणे यावर मार्गदर्शन करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी यांचे भान ठेवत सभासदांचे हित आणि संस्थेचा विकास ही दृष्टी समोर ठेवून आणि सर्वांना विश्वासात घेऊन उत्तरोत्तर संस्था आणखी नावारूपास आणण्यासाठी प्रयत्नशील राहू अशा भावना यावेळी नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी बोलताना व्यक्त केल्या.
यावेळी संतोष इंगवले, मोहन इंगवले, अण्णा इंगवले, संग्रामसिंह पवार, मिलिंद वेदपाठक, सचिन लवटे तसेच सौ मीनाक्षीताई दिघे, सौ सुरेखाताई लवटे, सौ पूजा इंगवले, सौ पूनम शिंदे, सौ स्वाती घोंगडे, सौ रेखा भोसले सौ उषा घाडगे, सौ सुवर्णा घाडगे, सौ वनिता कांबळे इत्यादी उपस्थित होते.



