महाराष्ट्र
सांगोला रोटरी क्लबतर्फे रंगकर्मी,रंगभूमी दिना निमीत्त कलाकाराचा सत्कार.

सांगोला रोटरी क्लब तर्फे डी.डी.जगताप यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल रंगकर्मी,रंगभूमी दिनानिमीत्त सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डी.डी.जगताप हा माझा बालपणापासूनचा मित्र असुन त्याने सांगोल्यातील नाट्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे,त्यामुळे सांगोला रोटरी क्लबने औचित्य साधून योग्य माणसाचा सन्मान केला आहे,असे गौरवोद्गार शंकरराव सावंत यानी काढ़ले.
सांगोला रोटरी क्लबने आयोजित केलेल्या रंगकर्मी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
तसेच रो.प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी त्यांच्या शालेय जीवनात गुरुवर्य जगताप यानी काम केलेल्या नाटकाची यादी सांगुन त्यांच्या शैक्षणिक व इतर सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला व जगताप सर यानी भाग घेतलेल्या नाटकाची यादी सादर केली.डॉ.कृष्णा इन्गोले यानी जगताप यांच्या संपुर्ण जीवन प्रकाशावर माहिती दिली.तसेच त्यानी लिहिलेले व जगताप सर यांचा लेख असलेले प्रिय गुरुजन हे पुस्तक रोटरी क्लबला भेट दिले.
सत्काराला उत्तर देताना जगताप यानी रोटरी क्लब बाबत कृतज्ञता व्यक्त करुन सांगोला विद्यामंदिर,नाट्य,फोटोग्राफी, क्रिडा,या क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली.तसेच सेवानिवृत्ती नंतर चैतन्य हास्य क्लबचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. रोटरी सदस्यसाठी योग शिबिर घेण्याचा मानस व्यक्त केला.रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे यानी सांगोला रोटरी क्लबच्या उपक्रमाची माहिती देवून उपस्थित सदस्यांचे स्वागत केले..
या प्रसंगी भागवत पैलवान,विलास पाटील सर यानी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या..रो.इंजि.विलास बिले यानी आभार प्रदर्शन केले..
या प्रसंगी रो.इंजि.अशोक गोडसे,रो.शरणाप्पा हळ्ळीसागर,म.शं.घोंगडे,पांडुरंग भुईटे,विश्वेश्वर कोठावळे,बाळासाहेब मेटकरी,प्रा.उत्तमराव घाटुळे,उत्तम पाटोळे,आदि उपस्थित होते…



