महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचा विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बहारदार नृत्याने संपन्न झाला. उपस्थितांची मने जिंकत बहारदार नृत्ये सादर करीत विद्यार्थ्यानी आपला जलवा दाखविला. सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल,सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालय व बालक मंदिरचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमाचे तिसरे पुष्प काल 20 डिसेंबर रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाले.
यावेळी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यानी लोकगीते,पोवाडे, विविध देखावे तसेच हिंदी,मराठी गाण्यांनी उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली.तत्पूर्वी दुपारी एक वाजता श्री व सौ जुंदळे व उपस्थित परीक्षक, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा ढाळे,प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर, बालक मंदिराच्या सविता देशमाने, सुकेशिनी नागटिळक, स्नेह संमेलन प्रमुख चेतन कोवाळे, आंडगे मॅडम दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रतिनिधी यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
या वेळी बहारदार नृत्यांचे परीक्षण श्री. योगेश गायकवाड, मोनिका भोसले, कु.संध्या तेली यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लता देवळे मॅडम व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले. सदर कार्यक्रमास पालकांची उस्फूर्त उपस्थिती लाभली.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यानी कोळीगीते ,शेतकरी गीते,देशभक्तीपर गीते, पोवाडा, जय श्रीराम चा नारा, विविध हिंदी मराठी गाण्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकत सांस्कृतीक कार्यक्रमात रंगत आणली. जय श्रीराम, शिवरायांची गाणी, कोळी गीते, या विशेष गाण्यांनी उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली.
आज सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक विद्यालय,इंग्लिश मेडिअम स्कूलचा बक्षीस वितरण समारंभ ख्यातनाम वक्ते प्राध्यापक सुरज चौगुले यांच्या शुभहस्ते तर संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली संस्था खजिनदार शं. बा .सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे . या कार्यक्रमास सर्व पालकांनी व विद्यामंदिर परिवारावर प्रेम करणाऱ्या शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे मॅडम व प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन इ. ७वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी केले. उपस्थित पालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.