महाराष्ट्र

श्री. विठ्ठल मल्टीस्टेट मध्ये कॅलेंडर लोकर्पण सोहळा संपन्न 

श्री. विठ्ठल मल्टीस्टेट मध्ये कॅलेंडर लोकर्पण सोहळा संपन्न

 

सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला येथील श्री. विठ्ठल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयात कॅलेंडर लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रम प्रसंगी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीची पूजन आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव(सर) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या कामकाजाविषयी चेअरमन दिपक बंदरे यांनी माहिती दिली. यावेळी अरविंद डोंबे (गुरुजी),

राजन चोथे, अनिल घोंगडे, दिलीप मारडे, राजू घोंगडे, प्रदीप मारडे, इरफान खतीब, बापू मार्डे, रमेश लोखंडे, प्रसाद जाधव, संतोष लाटणे,अर्जुन मासाळ (सर), धनाजी चव्हाण, सुधाकर भगत, उत्तम दिघे, प्रवीण भगत, महेश घोंगडे, विष्णू गोडसे इ. सह बँकेचे बहुसंख्य सभासद, ठेवीदार व कर्जदार उपस्थित होते.

 

आपुलकी प्रतिष्ठानला पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव (सर) यांचा सत्कार संस्थेच्या सी.एफ.ओ. सौ. सरस्वती पंडित मॅडम, सौ. स्वप्नाली फुले मॅडम व सर्व महिला अधिकारी यांचे हस्ते करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button