प्रशांत मस्के यांची सीनियर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुरुष संघाच्या संघ व्यवस्थापक पदी निवड.

सांगोला:-सोलापूर शहर जिल्हा अम्युचर बास्केटबॉल असोसिएशनचे सहसचिव प्रशांत मस्के यांची भावनगर गुजरात येथे 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2025 दरम्यान होणाऱ्या होणाऱ्या सीनियर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुरुष संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे .त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशांत मस्के हे सांगोला शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव म्हणून सुद्धा काम पाहत आहेत.कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय खुल्या बास्केटबॉल स्पर्धेच्या मुख्य आयोजनामध्ये प्रशांत मस्के यांचा सिंहाचा वाटा आहे.सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक बास्केटबॉल खेळाडू घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. प्रशांत मस्के यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुरुष संघाच्या संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आले.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.