न्यू इंग्लिश स्कूल जुनि . कॉलेज सांगोला राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिरामध्ये शेती विषयक योजनांचे मार्गदर्शन

: सांगोला:- शिक्षण विभाग पुणे . न्यू इंग्लिश स्कूल , जुनि . कॉलेज सांगोला व ग्रामपंचायत कमलापूर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबिर मौजे कमलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 ते शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून यामध्ये प्रबोधन कार्यक्रमांतर्गत 26 डिसेंबर २०२३ रोजी श्री बाळासाहेब सावंत कृषी सहाय्यक सांगोला यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना व गावकऱ्यांना कृषी विभागातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची सविस्तर माहिती दिली
अर्ज कसा करावा ‘ त्यासाठी किती अनुदान मिळते .त्यासाठी कोणत्या बँकेत प्रपोजर सादर करावे ‘याविषयी माहिती दिली त्याचबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून विविध उद्योगांची माहिती देऊन आपणही आपले छोटे उद्योग उभारून उद्योग विश्वामध्ये पदार्पण करू शकतो व यशस्वी उद्योजक होऊ शकतो याचे सविस्तर उदाहरणासहित मार्गदर्शन केले . उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी उद्योजकांना भेटी दिल्या पाहिजेत उद्योगाची माहिती जाणून घेतली पाहिजे त्यातील बारकावे पाहिले पाहिजेत त्यासाठी आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या उद्योगांना भेट द्या असे आवर्जून आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री विजय जगन्नाथ अनुसे (चेअरमन विकास सेवा सोसायटी ) हे होते . तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये नूतन सरपंच मधुकर नामदेव तंडे व सर्व ग्राम पंचायत सदस्य . गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा .मिलिंद पवार यांनी केले तर आभार प्रकल्प अधिकारी प्रा श्रीसंतोष राजगुरू यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ जुलेखा मुलाणी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले .