सांगोला लायन्स क्लबकडून गुरूवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

ला.इंजि.हरिदास कांबळे यांचे वाढदिवसानिमित्त आलेगाव येथे आयोजन


सांगोला ( प्रतिनिधी) समाजाला प्रेम आणि विश्वास देऊन लायन्स क्लबचे नेहमी आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रांमध्ये अमोघ कार्य सुरू असते हा विचार प्रमाण मानून मा.ला.इंजि. हरिदास कांबळे (समाजसेवक) यांचे वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोला, गुणाई सुमन डेअरी,आलेगाव व श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल, सांगली यांचे संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० ते ५:०० या वेळेत सिद्धनाथ मंदिर आलेगाव तालुका सांगोला येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेगाव येथील विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न होणार आहे
या शिबिराचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. मा.आमदार ॲड शहाजीबापू पाटील (विधानसभा सदस्य, सांगोला) मा. श्री. दिपकआबा साळुंखे-पाटील ( उपाध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) मा.डॉ.बाबासाहेब देशमुख (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना) यांचे शुभहस्ते व मार्गदर्शक मा.ला.प्रा.प्रबुध्दचंद्र झपके (प्रांतपाल ३२३४ ड १ सन २००९-१० ) यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी मा.सौ. नंदाबाई दिवसे (सरपंच), मा.श्री. राहुल ढोले (उपसरपंच), मा. अनिल खडतरे (मा. नगराध्यक्ष, सांगोला), मा. श्रीरंग (आप्पा)बाबर (मा. सरपंच), मा. बापू सखाराम कांबळे (गुरुजी), मा. ज्ञानेश्वर बाबर (ग्रा.पं.सदस्य) मा. सौ. सविता कांबळे (ग्रा.पं.सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती आहे.
तरी आलेगाव व परिसरातील गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.ला. इंजि. हरिदास कांबळे (समाजसेवक) मा. ला. सौ. सुमन कांबळे (चेअरमन) गुणाई सुमन डेअरी, आलेगाव यांच्यासह लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष ला.प्रा.धनाजी चव्हाण, सचिव ला. उन्मेष आटपाडीकर खजिनदार ला. प्रा. नवनाथ बंडगर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button