फॅबटेक इंजिनिअरिंग च्या १३ विद्यार्थ्यांची विंडवर्ल्ड प्रा. लि मध्ये निवड

सांगोला : फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन विंडवर्ल्ड प्रा. लि. मुंबई यांचे तर्फे घेण्यात आले होते या मध्ये पाच इंजिनिअरिंग महाविद्यालयांतील ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला होता. यामधून फॅबटेक इंजिनिअरिंग च्या १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि ही निवड परीक्षा , संभाषण कौशल्य,व मुलाखत माध्यमातून झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी दिली.
यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अनिल बुरुंगले, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील योगेश बंडगर, रोशन सुर्यागन, अजय चौगुले, ओमकार सुतार, व इलेक्ट्रिकल अँड टेलीकॅम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील आनंद खुळे, नवनाथ दुधाळ, राहुल देवकाते, संदीप इंगवले, निखील रोट्टी, आणि डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील श्रीयश ढोले , मयूर अतकर, शुभम बंडगर या विद्यार्थ्याची निवड झाली आहे .
फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करीत असते . या विभागामार्फत संभाषण कौशल्य व मुलाखती चे प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर विद्यार्थ्याचे भविष्याचा विचार करून व करियरच्या द्ष्ठीने मार्गदर्शन या विभागामार्फत केले जाते .
निवड झालेल्या विद्यार्थाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ .अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ.आर.बी.शेंडगे व सर्व विभाग प्रमुख , शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी विंडवर्ल्ड प्रा. लि या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
ट्रेनिंग प्लेसमेंट को-ऑर्डिनेटर प्रा. शरद आदलिंगे, प्रा. अविनाश सुर्यागण , प्रा.दुर्गा पाटील व प्रा.शशिकांत माने यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.