कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश.

कोळा (वार्ताहर) शैक्षणिक वर्ष-2024-2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत कोळा विद्यामंदिर हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले त्यानिमित्त प्रशालेमध्ये त्यांचा सत्कार घेण्यात आला.
त्यामध्ये इयत्ता पाचवी मध्ये यश मिळवणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे कुमारी संस्कृती जालिंदर सावळे. ( ग्रामीण सर्वसाधारण -J-63/368) व कुमार हर्षद प्रवीण आदलिंग.( ग्रामीण सर्वसाधारण -J-98/368) या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश मिळवले. इयत्ता आठवी मधून कुमारी ज्ञानेश्वरी समाधान आलदर.( ग्रामीण सर्वसाधारण J-2/302), कुमार प्रज्वल बिरुदेव जावीर.( ग्रामीण सर्वसाधारण J-18/302), कुमार पृथ्वीराज रामचंद्र कोरे.( ग्रामीण सर्वसाधारण J-38/302), कुमार प्रणव नवनाथ करांडे.( ग्रामीण सर्वसाधारण J-149/302), कुमारी सृष्टी जगन्नाथ हातेकर.( ग्रामीणअनुसूचित जाती B-1/1). या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरावर यश प्राप्त केले. वरील सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे सर पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर यांच्या हस्ते प्रशालेमध्ये सत्कार घेण्यात आला. वरील पाचवीच्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख दीप्ती काशीद मॅडम, नमिता देशमुख मॅडम, केशव निसाळ सर, विजयकुमार बाबर सर, सोमनाथ कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता आठवीसाठी विभाग प्रमुख निलेश कांबळे सर, प्रसादसिंह आदाटे सर, ज्ञानेश्वर सांगोलकर सर, विद्या जाधव मॅडम, सुखदेव कोळेकर सर, तेहरा तांबोळी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्राध्यापक पी.सी. झपके सर संस्था सचिव म. शं. घोंगडे सर, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, खजिनदार शं. बा. सावंत सर, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी साहेब, मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे सर, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर, सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.



