महाराष्ट्र

फॅबटेक मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

अलिकडच्या काळात प्रत्येक क्षेञात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धात्मक युगात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ते प्रश्न तुम्हालाच सोडवायचे आहेत. आपण आळशी बनत चाललो आहोत. मेहनत, कष्ट करण्याची माणसाची प्रकृती कमी आहे. विद्यार्थ्यांनी फॅबटेक कॉलेज मध्ये घेतलेल्या ज्ञानारुपी शिदोरीच्या जोरावर करिअर करावे. तुम्ही नशीबाने नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर नाव मिळवून मोठे व्हा असे मत फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी निरोप समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागातील विद्यार्थ्यांचा शनिवार दिनांक १२ जुलै २०२५ रोजी शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर ह्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. सोमनाथ ठिंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

दरम्यान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, डीन अ‍कॅडमिक डाॅ. अनुप विभुते, स्टुडंट डिन डाॅ. संजय पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी स्थान प्राप्त केल्याबद्दल कुमारी प्राजक्ता इंगवले, कुमारी सानिका कुलकर्णी आणि कुमार शिवराज कोळगी तसेच कुमारी माधुरी गायकवाड या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून महाविद्यालय व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. जयश्री मदने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button