महाराष्ट्र

कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

कोळा :- फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.10 वी) परीक्षेत कोळा विद्यामंदिर हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले असून हायस्कूल मधून 240 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 229 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा निकाल 95.42% लागला आहे. 90% च्या पुढे गुण 04 विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी विषयांमध्ये 100 पैकी 97 गुण तर मराठी 95, हिंदी 94, गणित 96, विज्ञान 96, समाजशास्त्र 98 गुण मिळवलेले आहेत.

 सेमी माध्यमाचा 100 % निकाल लागला असून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक कुमार समर्थ राजू आलदर 93.60 % ,द्वितीय क्रमांक कुमारी तन्वी नितीन काटे 91.60 %, तृतीय क्रमांक कुमारी अंजली विजय कोळेकर 90.40 %, गुण मिळवलेले आहेत. तर मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक कुमारी जान्हवी संजय माने 92.00 %, द्वितीय क्रमांक कुमारी संगीता पांडुरंग कोळेकर 86.20 %, तृतीय क्रमांक कुमारी प्रेरणा प्रभुलिंग शेटे 84.60 %, गुण संपादन केले आहेत. सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन पालकांसोबत सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

सदर विद्यार्थ्यांना प्रभुलिंग तेली सर, अशोक सरगर सर, शब्बीर शेख सर, आप्पासो सरगर सर, जगन्नाथ माने सर, किरण ढोले सर, शिवराज रायचुरे सर, मारुती सरगर सर, कुंडलिक आलदर सर, काकासो पांढरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर,सहसचिव प्रशुध्दचंद्र झपके साहेब, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button