सांगोला तालुकाराजकीय

सांगोला-जत रोडवरील माणनदी जवळचा रस्ता 10 दिवसात दुरुस्त करावा; अन्यथा कडलास ग्रामस्थांच्यावतीने माणनदीवर ठिय्या आंदोलन

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला-जत रोडवरील माणनदी जवळचा रस्ता 10 दिवसात दुरुस्त करावा अशी मागणी कडलास ग्रामस्थांच्यावतीने तहसीलदार सांगोला यांचेकडे निवेदनाव्दारे केली असल्याची माहिती युवा नेते दत्तात्रय टापरे यांनी दिली.
सांगोला-जत रोडवरील माण नदी जवळाचा रस्ता खुप खराब झाला आहे. त्या ठिकाणी मोठ मोठ्ठे खड़े पडले आहेत. यापूर्वी  निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले होते पंरतू आम्हास एकाच प्रश्नावरती दोन-दोन वेळा निवेदन देऊन आंदोलनाची वेळ येत आहे ही बाबत खेदजनक वाटते.
येत्या 10 दिवसामध्ये जर रोड दुरुस्त नाही झाला तर आम्ही सर्व गावकरी माणनदीवर ठिय्या आंदोलन करणार आहोत. आणि जोपर्यंत रस्ता दुरुस्ती चालू होत नाही तो पर्यंत आम्ही त्याठिकाणाहून अजिबात हटणार नाही. तरी याची दखल घेवून संबंधीत ठेकेदारास आपण तश्या सुचना देवून सामान्य माणसांच्या सुरक्षतेच्या दृष्ठीकोनातुन उपयोजना करण्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनावेळी राहुल गायकवाड, दत्तात्रय टापरे, दत्तात्रय जाधव, विजय सुरवसे, आकाश ठोकळे, विजय गायकवाड, रोहित गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!