कामटे संघटनेकडून देशसेवेचे कार्य- पो.नि.अनंत कुलकर्णी
रक्तदान शिबीरामध्ये 89 रक्तदात्यांचे रक्तदान

सांगोला(प्रतिनिधी):-शहीद अशोक कामटे संघटनेने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजीत करुन एका अर्थाने देशसेवेचे कार्य केले आहे. संघटनेने केलेल्या कार्याचे कौतुक करत यापुढेही संघटनेने समाज विधायक उपक्रम राबवून सातत्य ठेवण्याचे आवाहन सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
शहीद दिनानिमित्त व संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेकडून काल गुरुवार दि.3 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.निकीताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.रक्तदान शिबीरामध्ये 89 रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली.
रक्तदान शिबीराच्या उद्घाटन समारंभास सांगोला महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले सर, महिला सूत गिरणीच्या व्हा.चेअरमन कल्पनाताई शिंगाडे, अजिंक्यतारा पतसंस्थेचे चेअरमन गिरीषभाऊ नष्टे, सरपंच रामभाऊ शिंदे, ज्येष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्षा आशाताई सलगर, डॉ.अनिल कांबळे, आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, प्रमिला जगदाळे, मुख्याध्यापक रमेश पवार, प्रा.संताष कांबळे यांच्यासह देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ.निकीताताई देशमुख म्हणाल्या, शहीद अशोक कामटे संघटनेेने सामाजिक जाणीवेचे भान ठेवून उपक्रम आयोजीत केला आहे. वैद्यकीय क्षेत्रात रक्तदानाचे महत्व, फायदे याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यापुढील काळात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगत संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबीरास अॅड. विजयसिंह चव्हाण, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, राजकुमार घोंगडे, सांगोला रेल्वे स्टेशनचे अधिक्षक सतेंद्रकुमार सिंह, दादासाहेब खडतरे, अरुण कांबळे आदी मान्यवरांनी भेट देवून सामाजिक बांधिलकीचे भान जोपासत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबीर आयोजीत केल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकार्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे सर यांनी, सूत्रसंचालन संतोष कुंभार सर, आभार चारुदत्त खडतरे यांनी मानले. सदर रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तोसीफ शेख, अॅड.हर्षवर्धन चव्हाण, प्रकाश खडतरे, श्रीनिवास केदार, विठ्ठलपंत शिंदे, अनिल तारळकर, अतुल बनसोडे, शहाजी पाटील यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनाचे कार्य रेवनील ब्लड बँक, सांगोला यांच्यावतीने करण्यात आले.