फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीआणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
मनुष्य स्वभावतः कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही असे सांगणारे, लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, सुपरवायझर वनिता बाबर , सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री संजय देशमुख यांनी केले.
इयत्ता चौथीतील ईश्वरी गायकवाड, इयत्ता आठवीतील सृष्टी सावंत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बद्दल माहिती सांगितली तर इयत्ता सहावीतील अस्मिता फाटे या विद्यार्थिनींने अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती सांगितली. शाळेतील संगीत शिक्षक डॉ. अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीतील जगदीश खताळ व सहकारी विद्यार्थ्यांनी “आज मैना गावाकड राहिली” हा पोवाडा सादर केला.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असे संतप्त विधान करणारे थोर राजकारणी, सामाजिक, कार्यकर्ते, लोकनेते ‘लोकमान्य टिळक’ यांची पुण्यतिथी व महाराष्ट्राला एक लोकशाहीर साहित्यसम्राट म्हणून परिचित असलेले संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिलेले थोर लोकशाहीर ‘अण्णाभाऊ साठे’ यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.संजय देशमुख यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. प्रियांका मोहिते यांनी केले.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवयाझर वनिता बाबर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रूपनर , संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.