मुस्लिम समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाझरे, ता.1 :-नाझरे गावामध्ये साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच संजय सरगर व माजी सरपंच शामराव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी तानाजी वाघमारे सर, शिवभुषन ढोबळे सर ,आणि संभाजी हरिहर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठीचे योगदान सांगून पुढील काळात महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाज एक जुट राहण्याचा संदेश देखील यनिमित्त देण्यात आला .
यापुर्वी देखील नाझरे गावामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रशीद काझी सर यांनी केले तर आभार समीर मुलाणी सर यांनी मानले.जयंती उत्सव साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजातील आमिर नदाफ, कामरान काझी, आयाज काझी, लियाकत काझी , अली काझी,फिरोज मुलाणी, शब्बीर मुलाणी, अयान तांबोळी ,अरबाज तांबोळी यांनी योगदान दिले.सदर कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्व समाजातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.