बाळासाहेब तेली – एक अध्यात्मिक विद्यापीठ –

बाळासाहेब गेले …..विश्वासच बसत नाही या गोष्टीवर.त्यांचा अपघात झाला,त्या वेळी मी सांगोल्यात नव्हतो.परगावी असल्याने सांगोला आल्यानंतर बातमी समजली.त्यामूळे चैतन्य हास्य क्लब मध्ये दररोज त्यांच्या विषयी माहिती घेवून त्याना लवकर हास्य क्लब मध्ये येवू दे,अशी प्रार्थना केली जायची.जगताप सर, डोंबे गुरूजी, म.शं.घोंगडे फोन करुन माहिती घेवून सर्वाना बातमी देत.परमेश्वर इतका निष्ठूर कसा काय असू शकतो….त्याने कोणाचीही प्रार्थना स्विकारली नाही.बाळा साहेबाना घेवून जाताना त्याला कसे काय वाटले नाही..

 

बाळासाहेब म्हणजे विट्ठलचे मुर्तिमंत रुप होते.साधी राहणी,कपाळी टीळा,डोक्यावर टोपी,अन सदा हसतमुख असणारे,सावळ्या रंगाचे बाळासाहेब म्हणजे विट्ठलचे प्रतिबिंब होते.आवाज गोड आसल्यने व वज्राबाद भजनी मंडळाचे सद्स्य असल्याने भक्तिगीत, अभंग, गौळणी अतिशय तन्मयतेने व भक्तिभावाने सादर करत असत .त्यांच्या पिशवीत देवाचे फोटो असत .

हास्य क्लब मध्ये आल्या नंतर देवाची मांडणी करुन भक्तीभावाने नमन करुन ओंकार,प्रार्थना , भजन सादर करत असत.जय हरी म्हणून ते बोलण्यास सुरुवात करत असत.दररोज कोणती तिथि आहे,सुर्योदय व सुर्यास्त किती वाजता आहे,पावसाचे कोणते नक्षत्र आहे,त्याचे वाहन कोणते आहे,याची ते इत्यम्भूत माहिती देत असत.दररोज वारा प्रमाणे वेगवेगळ्या देवतांची प्रार्थना,अभंग सादर करत असायचे.मणके व गुढ्घे यांचा विकार असुन देखिल ते वेळेत काठी टेकत टेकत सगळ्यांच्या अगोदर हजेरी लावत.परगावी जायचे असल्यास  सांगून जात.हास्य क्लब मध्ये कार्यक्रम असल्यास फोन करुन सर्वाना बोलवून घेत असत.स्वभावाने नम्र, शांत, संयमी,हसतमुख असल्याने भजनी मंडळ व अधिक महिन्यातील दिंडीत विणेकरी होण्याचा मान त्यानाच दिला जायचा.स्वभावाने दिलदार व दानशूर असल्याने ते सर्वाना मनापासून खाऊ- पिवू घालत होते.

हास्य क्लब मध्ये त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या.परिवारातील.सर्व सद्स्य जातीने हजर रहात असत.शिक्षण अल्प असुनही अथक परिश्रम,गोड स्वभाव यामुळे त्यानी व्यापारात जम बसवून यशस्वी करुन दाखविला.सलग पंचवीस वेळा आळंदीची वारी करणाऱ्या  बाळासाहेबांना विट्ठलाने कामिनी एकादशी दिवशी बोलावणे धाडले याला काय म्हणायचे..दैव,पुण्य की विट्ठल भक्ती.खरच परमेश्वर आपल्या भक्ताची मनोकामना पुर्ण करतो,असेच म्हणण्यास हरकत नाही.दहा दिवस अखंड मृत्युशी झुंज देवून बाळासाहेब एकादशी दिवशी इहलोकी गेले,हे पुण्यकर्माचे एक फळ आहे.बाळासाहेब अध्यात्मिक असल्याने चैतन्य हास्य क्लबने त्याना ह.भ.प.पदवी बहाल केली होती.

एका कार्यक्रमात त्याना सन्मानपूर्वक ही पदवी देण्याचे ठरवले होते.परंतु दैवाने घाला घातला आणि बाळासाहेब आपल्यातून दूर निघुन गेले.बाळासाहेब एक अध्यात्मिक क्षेत्रातील विद्यापीठ होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.मागील वर्षी झालेल्या त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त व या वर्षी झालेल्या त्यांच्या धर्मपत्नीच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला हजेरी लावण्याचे भाग्य मला मिळाले…खूप.आठवणी आहेत,प्रसंग आहेत,किस्से आहेत…बाळासाहेब चैतन्य हास्य क्लब तुमचा सदोदित ऋणी राहिल.भावपूर्ण आदरांजली!!!!!

प्रा.राजाभाऊ ठोंबरे.
        सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button