जुनोनीतील बहुजन समाज बांधवाकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन आणि जिल्हा परिषद शाळेत केले सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुनोनी :-दिनांक 1ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जुनोनीतील बहुजन समाज मधील युवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोनी येथे येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली .
कार्यक्रमासाठी डॉक्टर श्री. महेश कोरे सर, डोंगरगाव ग्रामपंचायत सदस्य श्री नवनाथ राजगे, अमृत पाटील दादासाहेब सकट संतोष सकट पत्रकार श्री गणेश कांबळे, संतोष मारकड,विलास गुळीग श्री एकनाथ चौगुले महेश कांबळे श्री विजय कांबळे संजय कांबळे इत्यादी सह अनेक युवक उपस्थित होते.
मान्यवराच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक श्री परशराम भोसले गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना या दोन महान इतिहास अजरामर करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले ,तर पत्रकार गणेश कांबळे यांनी आपल्या संबोधनामध्ये विद्यार्थ्यांनी केवळ या महान व्यक्तींच्या पुस्तकाचे किंवा त्यांच्या कार्याचे नुसते वाचन करून चालणार नाही तर ते आत्मसात करून प्रत्यक्षात त्यांनी कशा पद्धतीने अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला संघर्ष केला समाजासाठी कसे झगडले याबद्दल केवळ भाषण करून चालणार नाही किंवा पाठांतर करून चालणार नाही तर त्यांचे विचार प्रत्यक्षात आपल्या कृतीमध्ये उतरवले तरच त्यांना खऱया अर्थाने आपल्या आत्ताच्या युवकाकडून, विद्यार्थ्याकडून आदरांजली वाहिली जाईल असे संबोधित केले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कादंबर्या, पोवाडे, नाटके इत्यादी साहित्याचा उल्लेख करत त्यांनी समाजामध्ये त्यावेळी जी जागृती निर्माण करण्याचं काम केलं आणि आजही त्यांच्या लेखनाचा जगभरामध्ये जो प्रसार झाला त्याबद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास वाघमारे गुरुजी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावरील अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे दुसऱ्या टप्प्यांमध्ये बहुजन समाज मंडळातील युवकाकडून विद्यार्थ्यांना वही पेन अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या आणि लेखन साहित्याची वाटप केले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी आमच्या जुनोनी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजया पाटील मॅडम आणि सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले. अशा सामाजिक कार्यक्रमांमध्ये युवकांचा सहभाग कायम असावा अशी मुख्याध्यापकांनी अपेक्षा व्यक्त केली आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.