नंदेश्वर येथील जि.प. प्राथमिक केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सरपंच सजाबाई गरंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या लहान मुलांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांनी रोख रकमेच्या बक्षिसासह टाळ्या व शिट्यांची भरभरून दाद दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या राजश्री कांबळे,अंबुताई पाटील, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब सासणे, उपाध्यक्ष पोपट बंडगर,मेजर बिरा दोलतडे,माजी अध्यक्ष दामाजी सलगर,सदस्य प्रताप परीट,संजय भोसले,श्रीकांत जोरवर,जावेद मणेरी,प्रशांत कसबे,प्रकाश रामगडे,सुनिल कसबे यांच्यासह सहशिक्षक अशोक मासाळ,बाळासाहेब मासाळ,बाळासाहेब मोरे,सचिन लाळे,सुशेन क्षीरसागर,दादासाहेब इंगोलेसह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोक मासाळ यांनी व्यक्त केले.