महाराष्ट्र
नाझरे येथील श्रीमती सुमन बनसोडे यांचे निधन

नाझरे ता. सांगोला येथील श्रीमती सुमन मारुती बनसोडे यांचे गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी पहाटे पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्षे 74 होते. प्रा. विकास बनसोडे, मुकुंद बनसोडे, संजय बनसोडे यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता नाझरे येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.



