आरोग्य उपसंचालक रामचंद्र हंकारे यांची सांगोला ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट
सांगोला(प्रतिनिधी):-आपण सांगोलकर आहोत. इथे आपण राहतो त्यामुळे आत्मियेने, नैतिकतेने व सामाजिक बांधिलकीने रुग्णांची सेवा करा. ग्रामीण भागातील रुग्णांना शासकीय योजनांचा जास्त जास्त लाभ मिळाला पाहिजे. रुग्णांना चांगली सेवा द्या असे सांगत ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा करा अन्यथा जागेवरच निलंबीत करणार असल्याचा इशारा आरोग्य उपसंचालक रामचंद्र हंकारे यांनी केले.
पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक रामचंद्र हंकारे यांनी काल शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अचानक भेट देऊन सांगोला ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी डॉ.उत्तम फुले, डॉ.शंभूराजे साळुंखे, डॉ.वंदना चाकणे, डॉ.पूजा साळे उपस्थित होते. यावेळी आरोग्य उपसंचालक रामचंद्र हंकारे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचा आढावा घेवून सर्व डॉक्टर, आरोग्यसेविका व कर्मचार्यांना सूचना दिल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉ.रामचंद्र हंकारे बोलत होते.