कोळा परिसरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली~ॲड सचिन देशमुख
कोळा येथे लोकनेते किसनराव कोळेकर संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.

कोळा येथील लोकनेते किसनराव कोळेकर अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. कोळे या संस्थेने या भागातील इयत्ता दहावी बारावी नेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा सत्कार करून कौतुक केलेले कार्य उत्कृष्ट प्रेरणादायी असून विद्यार्थी विद्यार्थिनी मिळालेले मार्क गुण पाहून प्रभावित झालो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात भरारी घेतली असल्याचे विचार कोळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य ॲड सचिन देशमुख यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथील लोकनेते किसनराव कोळेकर अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. कोळे या शाखेच्या इयत्ता दहावी बारावी व नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ पार पडला यावेळी नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ॲड सचिन देशमुख म्हणाले यशस्वी विद्यार्थ्यांनी घरात कष्ट करून आई-वडिलांची परिस्थिती जाणीव ठेवून यश मिळवले आहे याचा मला अभिमान आहे विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते याचे उदाहरण यशस्वी विद्यार्थी आहेत आपल्या भागातील इयत्ता दहावी मध्ये स्नेहल अनिल कोळेकर अश्विनी नानासो आलदर साधना परमेश्वर आलदर गणेश देवाप्पा आलदर रेणुका रावसाहेब नरळे ऋतुजा संतोष कोळेकर तसेच नीट परीक्षेत श्रवण दादा कोळेकर आकाश शहाजी पाटील प्रेम प्रमोद पोरे पुनम बाबासो आलदर अर्णव राजाराम बंडगर सुमित शिवाजी करांडे यांचा सन्मान व सत्कार करून संस्थेने चांगले कार्य केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा देतो ॲड सचिन देशमुख यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमास सांगोला खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विलासराव देशमुख, कोळा गावचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख, चेअरमन सोपान कोळेकर समाजसेवक रमेश कोळेकर पंच, उपसरपंच डॉ सादिक पटेल पत्रकार जगदीश कुलकर्णी, दिलीप देशमुख, दगडू कोळेकर, दादा कोळेकर चंद्रकांत कोळेकर अमोल माने अनिल कोळेकर रंगा तात्या मोरे संदीप पाटील हरिभाऊ सरगर विजय आलदर, अनिकेत पोरे शंकर गोरड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते किसनराव कोळेकर अर्बन को. ऑप क्रेडीट संस्थेच्या सर्व मॅनेजर कर्मचारी क्लार्क पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार सत्यम उर्फ बालु आलदर यांनी मानले.



