सैनिकी मुलां – मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सैनिकी मुलां-मुलींसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, इच्छुक माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, विर पत्नीच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संबंधित वसतिगृह अधीक्षक किंवा अधीक्षिका यांच्याकडे ३० जून २०२२ पर्यंत अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना वसतिगृहात सवलतीच्या दरात निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच माजी सैनिक विधवा पत्नीचे पाल्य, विर पत्नीच्या पाल्यांना व सैनिकांच्या अनाथ पाल्यांना वसतिगृहामध्ये नि:शुल्क भोजनाची व निवासाची सोय उपलब्ध आहे. तरी ज्या आजी व माजी सैनिकांचे तसेच सैनिक विधवांचे व विर पत्नीचे पाल्य सोलापूर येथील शैक्षणिक संस्थेत इयत्ता 8 वी ते पुढील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत आणि जे वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी वसतिगृह अधिक्षक व अधिक्षीका यांचेकडून अर्ज सादर करावेत
तसेच खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश हा प्रथम घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांचे सैनिकी मुलां- मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेश हा प्रथम प्राधान्य म्हणून पाल्याचा प्रवेश त्याच जिल्ह्यात शहरात शाळा किंवा महाविद्यालयामध्ये घेतलेला असावा व तदनंतर द्वितीय प्राधान्य म्हणून खाजगी शिकवणीमध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांनाही प्रवेश देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. वरील प्रवेश प्रक्रियेमध्ये सैनिकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मुलींचे वसतिगृह दुरध्वनी क्रमांक- 0217-72301778 मोबाईल क्रमांक- 9527584034 व मुलांचे वसतिगृह दुरध्वनी क्रमांक- 0217-72302228 मोबाईल क्रमांक 7906583037 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे