महाराष्ट्र

जि. प. प्रा. शाळा जवळे नं २ येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी.

जवळे वार्ताहर .विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्याग मुर्ती अर्थात माता रमाई यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे नंबर २येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

माता रमाई व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुजन करून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून माता रमाई यांच्या त्यागाची करूणेची सहनशीलता या विषयावर आपले मत व्यक्त करून माता रमाई यांच्या शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य होऊ शकले नसते .यावेळी शाळेतील लेझीम पथकाने माता रमाई यांच्या गीतांवर लेझीम नृत्य साकार करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी ज्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला त्यांना कंपास बॉक्स व वही भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

 

या कार्यक्रमाला आयू अशोक जगधने सामाजिक कार्यकर्ते मा.अरूण कसबे, नेहल व्हनकट्टे (सर) शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी गुरूजी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते जगदीश मागाडे यांनी कंपास बॉक्स व वही भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button