महाराष्ट्र

पुणे विभागीय महसूल क्रीडा  स्पर्धेत सांगोला महसूल टीमचे घवघवीत यश…..

पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यांतर्गत सांगोला महसूल टीमने सहभाग नोंदवला होता यामध्ये  उत्कृष्ट नाटिका प्रथम क्रमांक टीम सोलापूर उत्कृष्ट डुएट सॉंग प्रथम क्रमांक टीम सोलापूर उत्कृष्ट वेशभूषा वधू  टीम सोलापूर प्रथम क्रमांक  उत्कृष्ट अभिनय-मदन जाधव उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम  टीम सोलापूर तृतीय क्रमांक पटकाविला या  सांगोला येथे कार्यरत ग्राम महसूल अधिकारी  संचलन पथकास लीड केले भाला फेक – द्वितीय क्रमांक संचलन पथकास उत्कृष्ट संचलन द्वितीय क्रमांकविजेत्या संघांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे साहेब यांनी अभिनंदन करून स्वागत केले आहे.
सातारा येथे पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.सातारच्या पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे नेटके नियोजन केले, या स्पर्धेत सांगोला तहसील कार्यालयातील तहसीलदार संतोष कणसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेसाठी सांगोला जयश्री कल्लाळे प्रणाली भितकर  पूनम कडलासकर वंदना गुप्ता विजया नाईक उदया देसाई महेश जाधव उमाकांत मोरे श्रीरंग लोखंडे  प्रसेनजीत कांबळे  समाधान वगरे किरण बाडीवाले  मिलिंद पेटकर सुरेश कदम विजय कुदळे आदींनी सहभाग नोंदवला होता.या प्रसंगी सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button