महाराष्ट्र राज्याच्या नेट बॉल संघामध्ये नाझरा विद्यामंदिरच्या आदित्य मिसाळ याची निवड

दि. 23 ते 26 फेब्रुवारी 2025 रोजी हरियाणा राज्यातील भिवानी या ठिकाणी होणाऱ्या 37 व्या जुनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेच्या महाराष्ट्राच्या संघामध्ये नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज चा विद्यार्थी आदित्य आनंद मिसाळ याची निवड झाली आहे. दि. दहा ते बारा जानेवारी रोजी पुणे येथे अठराव्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व सब ज्युनिअर स्पर्धा संपन्न झाल्या होत्या.
यामधून आदित्य मिसाळ याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.दि.18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान भंडारा येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्यास क्रीडाशिक्षक स्वप्निल सासणे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व पुढील खेळासाठी शुभेच्छा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी दिल्या.