विद्यार्थी शिवसेना व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष आयोजित आरोग्य तपासणी शिबिर

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी शिवसेना व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सांगोला यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपादन झाले.
. सदर आरोग्य शिबिर डॉ.परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे मॅडम खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोला तालुक्याचे मा.आमदार अँड.शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. सदर आरोग्य शिबिरामध्ये स्त्रीरोग विभाग , सर्जरी विभाग , मेडिसिन विभाग , अस्थिरोग विभाग , बालरोग विभाग , या विभागातील रुग्णांची मोफत तपासणी मोफत उपचार व मोफत शस्त्रक्रिया ह्या सेवा देण्यात आल्या .
सदर मोफत आरोग्य शिबिरामध्ये एकूण 187 रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले . यामध्ये वयोवृद्ध ,महिला , पुरुष , तरुण , यांचा सहभाग होता . या आरोग्य शिबिराच्या दरम्यान श्री.मंगेश चिवटे-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य यांनी व्हिडिओ कॉल द्वारे रुग्णांशी संवाद साधला व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले . दरम्यान या कार्यक्रमासाठी श्री श्री.सागर कोल्हे-समन्वयक उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर , श्री.रोहन बलाक्षे-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर उपजिल्हाप्रमुख , श्री.सागर दादा पाटील-संपर्कप्रमुख युवा सेना सोलापूर , श्री.प्रितेश दिघे-विद्यार्थी शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख , श्री.शंकर दुधाळ-विद्यार्थी शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख , श्री.अजिंक्य राणा शिंदे विद्यार्थी शिवसेना सांगोला तालुकाप्रमुख , श्री.सुरज काळे-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सांगोला तालुकाप्रमुख , श्री आदित्य शेगावकर-उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सांगोला शहर प्रमुख श्री.रविराज शिंदे-बलवडी उपसरपंच इत्यादी पदाधिकारी व असंख्य शिवसेनेचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या…!