जवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

जवळे (वार्ताहर)कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळे मध्ये 19 फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम प्रशालेतील जेष्ठ शिक्षक प्राध्यापक श्री. ए.जी. गायकवाड सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या इतिहासाची व कार्याची माहिती दिली.
इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी आदिती हाके हिने शिवाजी महाराजांच्या कार्याची कर्तबगारीची माहिती सांगणारा अतिशय उत्कृष्ट असा पोवाडा सादर केला. तसेच इयत्ता आठवी वर्गाच्या विद्यार्थिनींनी लाठीकाठीचा क्रीडा प्रकार सादर केला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना छान प्रतिसाद दिला. सदर प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.बाळासाहेब शिंदे सर उपमुख्याध्यापक श्री.संजय पौळ सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.शिंदे बी.डी. सर यांनी केले.