नाझरा विद्यामंदिर प्रशालेत कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांना अभिवादन

नाझरा(वार्ताहार):- थोर स्वातंत्र्य सेनानी,सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जयंतीनिमित्त नाझरा विद्यामंदिर प्रशालेत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

 

प्रशालेत कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांची जयंती व व्यासपौर्णिमा साजरी करण्यात आली.प्रशालेचे पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते व ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील,वसंत गोडसे,रावसाहेब बंडगर,सोमनाथ सपाटे,अतुल बनसोडे, शिक्षकेतर कर्मचारी गणेश रायचूरे, संजय खोकले यांच्या उपस्थितीत दोन्ही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button