सांगोला महाविद्यालयात हेल्थ आणि हॅप्पीनेस कार्यशाळा संपन्न

सांगोला महाविद्यालय सांगोला येथील संगणक विभाग व आर्ट ऑफ लिविंग यांचे संयुक्त
विद्यमाने हेल्थ आणि हॅप्पीनेस कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
उद्घाटनपर भाषणात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व आपले
आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच मार्गदर्शक श्री. अविनाश
कुलकर्णी यांनी मन स्थिर करणे, एकाग्रता वाढविणे यासाठी श्वासावरती नियंत्रण करणे कसे आवश्यक
आहे हे वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले.

 

आर्ट ऑफ लिविंग चे सोमनाथ लवटे संजय
गव्हाणे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात संगणक विभागातील साधारणता 500 हून अधिक
विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सदाशिव शिंदे सर यांनी केले. हा
कार्यक्रम पार पाडण्यासाठी संगणक विभाग प्रमुख डॉ. राजकुमार ताठे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button