महाराष्ट्र
उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

उत्कर्ष प्राथमिक विभागात सन 2024 -25 चा वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न झाला. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचा ४७ वा वर्धापन दिनानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर उपस्थित कार्य क्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.जगन्नाथ महादेव घोंगडे व त्यांच्या सुविदय पत्नी सौ. सुजाता घोंगडे ,संस्था सचिव मा.वसुंधराताई कुलकर्णी , कोषाध्यक्षा मा. डॉ.शालिनीताई कुलकर्णी , माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुलकर्णी सर बालक मंदिर मुख्याध्यापिका संध्या ताई शास्त्री, पर्यवेक्षक सौ .शालन ताई ,ज्युनिअर विभाग पर्यवेक्षक सौ.मजगे मॅडम, प्रवचनकार मधुरा ताई कुलकर्णी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता चौथीच्या मुलींनी स्वागत गीतातून पाहुण्यांचे आदरयुक्त स्वागत केले. प्राथमिक विभागात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व पंचसूत्री चे महत्त्व प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका मागाडे बाईनीं सांगितले. प्रमुख पाहुण्यांची ओळख व कार्य याची थोडक्यात ओळख शेळके सरांनी करून दिली.१ ली ते ४ थी विद्यार्थ्यांच्या कथाकथन, रंगभरण, हस्तकला, स्मरणशक्ती, क्रिडा स्पर्धा मध्ये सूर्यनमस्कार, योगासन, चमचा लिंबू, तीन पायांची शर्यत,लंगडी, कबड्डी, अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रमुख पाहुणे घोंगडे आजोबा यांनी मुलांना छान बोधकथा सांगून सदैव मदतीची सवय असावी असे प्रतिपादन केले. संस्थेच्या कोषाध्यक्ष मा. डॉ. शालूताई कुलकर्णी यांनी शिस्त, नियमित व्यायाम व सूर्यनमस्कार घालणे, आवश्यक आहे.संयम व धैर्य असेल तरच यश मिळते असेही सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विश्रांती ताई, उपमुख्याध्यापिका स्वराली ताई कुलकर्णी यांनी अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्नेहा महिमकर यांनी केले. सौ स्नेहल रसाळ यांनी आभार मानले.सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



