महाराष्ट्र

अस्तित्व संस्थेने  नेहमी समाजाला दिशा देण्याचे व गरिबाना दिलासा देण्याचे काम केले आहे- डॉ बाबासाहेब देशमुख 

अस्तित्व संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून सांगोला,मंगळवेढा सारख्या दुष्काळी भागात विविध मुद्द्यांवर काम करते हे कौतुकास्पद आहे परंतु शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम समाजाला प्रेरणा देणारे आहे, अस्तित्व संस्थेने आजपर्यंत समाजाला दिशा देण्याचे तसेच गोरगरिबाना दिलासा देण्याचे, आधार देण्याचे काम केले आहे असे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलं.
सांगोला येथील महात्मा फुले सभागृहात अस्तित्व संस्थेच्या वतीने शिक्षण व आरोग्य या विषयावर काल कार्यशाळा आयोजित केली होती त्यानिमित्ताने  क्राफ्टसमाला प्रकल्पांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू मुलींना लॅपटॉप वाटप कार्यक्रम पण आयोजित केला होता त्या कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड होते.मंचावर प्रमूख अतिथी डॉ. श्रद्धा जवंजाळ, वाणीचिंचाळे गावच्या सरपंच सौ. प्रियांका जितेंद्र गडहिरे, अजनाळे गावच्या सरपंच सौ.चंद्रकांत पवार, अस्तित्वचे अध्यक्ष, शहाजी गडहिरे,उपाध्यक्ष अरुण कसबे इत्यादी उपस्थित होते.
पुढें बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले शहाजी गडहिरे यांच्या परिश्रमातून कोविड सारख्या काळात अस्तित्व संस्थेने गरिबाना मदत करून त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवले हे ऐतिहासिक काम आहे.शिक्षणाच्या क्षेत्रात सांगोला तालुका आघाडीवर आहे. यापुढेही तालुक्यात दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.
अध्यक्षीय भाषणात बाबुराव गायकवाड म्हणाले अस्तित्व संस्थेने गरीब गरजू मुलींना लॅपटॉप देऊन मोठे काम केले आहे. अस्तित्व च्या या कामात यापुढेही माझे निश्चित सहकार्य राहील हल्ली शिक्षणाकडे सर्व स्तरातून दुर्लक्ष होत आहे, गरीबांना परवडणार शिक्षण निर्माण व्हायला पाहीजे तरच गरिबांची मुले शिकतील.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.श्रद्धा जवंजाळ  म्हणाल्या की आज दिवसेंदिवस शिक्षणाचे प्रमाण वाढत असलं तरी आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, महिला आणि मुली मध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे त्याबाबत महिला व मुलींनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. महिला व मुलींनी कॅन्सर प्रतिबंधात्मक लस घ्यावी.अस्तित्व संस्था करीत असलेले काम कौतुकास्पद असून त्याच्या कामाला आम्ही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य करू. यानंतर मुलींना मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉप चे वाटप करण्यात आले एकूण 14 मुलींना लॅपटॉप वाटप करण्यात आले त्यामध्ये सुकन्या शिवशरण (वाढेगाव), शितल सावंत (हंगीरगे), तनुजा माने, साक्षी काळे (सोनंद), सुप्रिया जाधव (सांगोला), अर्पिता दोडके (लोणविरे), प्रेरणा जगताप (लोहगाव), पूजा शिंदे (अकोला), माहेश्वरी सुतार (कुणीकोणुर),स्वप्नाली काकेकर (घेरडी), सानिका जाधव (दिघंची), माधुरी खटकाळे (अकोला), सोनम काटे (सांगोला), प्राजक्त लोखंडे (वाढेगांव) या मुली आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी केले त्यांनी अस्तित्व संस्था करीत असलेल्या कामाची संक्षिप्त माहिती देऊन लॅपटॉप देण्यामागची पार्श्वभूमी सांगितली यावेळी सांगोला तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते अरविंद केदार, आपुलकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र यादव, माजी नगरसेवक किशोर बनसोडे,बाळासाहेब बनसोडे, एस टेक कॉम्प्युटरचे सचिन पवार, सखी सहेली मंच च्या सौ शुभांगी लिगाडे, बी पी मेडिकेअरचे संचालक प्रशांत कांबळे,जितेंद्र गडहिरे,चंद्रकांत पवार, खंडेराव लांडगे यांच्यासह स्वामी विवेकानंद हायस्कुल चे विलास गवळी, मानेगाव हायस्कुल च्या सौ सुवर्णा काशिद, पारे हायस्कूलच्या सौ माने मॅडम, गेजगे सर,जुजारपुर हायस्कूलचे माळी सर, शेंडगे सर, गुरुदत्त विद्यालयाच्या देवकते मॅडम यांच्यासह शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज चे प्रा.पोपट पवार, चव्हाण सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर लवटे व स्वप्नाली काकेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण सूर्यगंध, संकल्प गडहिरे यांनी केले.
———————————–
महिला व मुलींमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सर चे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे,प्राथमिक अवस्थेत त्यावर उपचार झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो त्यासाठी महिला व मुलींनी जागरूक राहिले पाहिजे.यापुढच्या काळात कॅन्सर प्रतिबंध व जागृती अभियान राबवून एच पी व्ही लस देण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामध्ये अस्तित्व संस्थेने पुढाकार घेतल्यास मी सर्वतोपरी सहकार्य करेन- डॉ. श्रद्धा जवंजाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button