आम.शहाजीबापूंच्या मतदारसंघात बुधवारी आदित्य ठाकरे यांचा दौरा, बांधावर जाऊन शेतकर्यांशी साधणार संवाद,
शेतकरी बांधवांच्या समस्यांवर आदित्य ठाकरे सरकार दरबारी आवाज उठविणार-अनिल कोकीळ

सांगोला(प्रतिनिधी):- अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. शासनाने आदेश काढून देखील काही ठिकाणी अद्यापही पंचनामे झाले नाहीत त्यामुळे शेतकर्यांनी काय करावे हा मोठा प्रश्न शेतकर्यांपुढे पडला आहे.शेतकर्यांना आधार देण्यासाठी फक्त शिवसेना बांधील असून शेतकरी बांधवांना कधीही वार्यावर सोडणार नाही असे सांगत सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या समस्यांवर आदित्य ठाकरे सरकार दरबारी आवाज उठवणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे 9 नोव्हेंबर रोजी सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त संगेवाडी आणि मांजरी येथे बांधावर जाऊन शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत. या दौर्याच्या अनुषंगाने सांगोला शिवसेना यांच्यावतीने पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ बोलत होते. यावेळी शिवसेना नेते लक्ष्मण हाके, कमरुद्दीन खतीब, सुर्यकांत घाडगे, शंकर मेटकरी उपस्थित होते.