महाराष्ट्र

फॅबटेक इंजिनिअरिंगमध्ये नक्षत्र २ के २५ स्नेहसंमेलनाचा रंगतदार सोहळा संपन्न

सांगोला  – फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नक्षत्र२ के २५ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा झाला . यामध्ये सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव दिनांक १७ मार्च ते २२ मार्च २०२५ दरम्यान उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, अशी माहिती सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. राहुल पाटील यांनी दिली.

क्रीडा स्पर्धांचा जोश – विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, खो-खो,रस्सीखेच, बॅडमिंटन, बुद्धिबळ, आणि कॅरम यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघ व खेळाडूंना विशेष सन्मान प्रदान करण्यात आले.

पारंपारिक वेशभूषा दिवस – भारतीय संस्कृतीचे दर्शन-स्नेहसंमेलनाच्या विशेष आकर्षणांपैकी एक म्हणजे पारंपारिक वेशभूषा दिन या दिवशी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या पारंपारिक पोशाखांमध्ये सहभाग घेतला आणि भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहारदार नजराणा- स्नेह संमेलनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गायन, मिमिक्री, एकपात्री अभिनय, स्टँडअप कॉमेडी या आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले. विशेषतः समूह नृत्य, फैशन शो आणि थीम ड्रामा यांना विशेष दाद मिळाली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची प्रेरणादायी उपस्थिती ठरली या भव्य सोहळ्याला विशेष गती मिळाली ती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमुळे. मुख्य अतिथी सांगोला तालुक्याचे नायब तहसीलदार मा.संतोष सांळुखे साहेब तसेच फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष  मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, फॅबटेक एज्युकेशन सोसायटी चे सचिव  डॉ.अमित रुपनर, व्यवस्थापकीय प्रतिनिधी प्राजक्ता रूपनर , कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर,फार्मची कॉलेज प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले ,पब्लिक स्कूल चे प्राचार्य प्रा.सिकंदर पाटील, डीन ॲकॅडमिक डॉ.शरद पवार, डीन स्टुडंट डॉ.संजय पवार तसेच सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. राहुल पाटील आणि क्रीडा विभाग समन्वयक प्रा. सुनीलकुमार बंडगर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले. त्यांचे नियोजन आणि समर्पण यामुळे “ नक्षत्र 2 के 25 ” अधिक प्रभावी व संस्मरणीय ठरले. महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषद मंडळाचे सर्वसाधारण सचिव श्री. अन्नुर मुलाणी, सांस्कृतिक सचिव श्री. निंगराज बिराजदार, तसेच क्रीडा सचिव श्री. संकेत कारंडे यांनी संपूर्ण कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे सर्व स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. याशिवाय, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. अर्पिता शिंदे व कु. तृप्ती बाबर यांनी मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन देत उत्कृष्ट योगदान दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रियांका पावसकर यांनी केले.
या भव्य स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांमध्ये नवीन जोम आणि आत्मविश्वास निर्माण केला असून, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक सुवर्णक्षण जोडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button