फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी दिवस साजरा

सांगोला(प्रतिनिधी):-फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस म्हणजे शैक्षणिक क्रांतीची व युगांतराची चाहुल होय.शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून आदर्श विद्यार्थी निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी विद्यार्थी दिवस साजरा केला जातो.कार्यक्रमासाठी फॅबटेक स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, सुपरवायझर सौ वनिता बाबर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. समाधान खांडेकर, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेच्या सहशिक्षिका सौ.शितल बिडवे यांनी विद्यार्थी दिवसाचे महत्त्व सांगितले.तर इ.आठवीतील कु.पार्थ बिडवे यांने विद्यार्थी दिवसाचे मनोगत व्यक्त केले.1
सूत्रसंचालन सौ.रुपाली माने यांनी केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.